मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

बटाटा लागवड - अश्या पदधतीने घ्या पूर्वहंगामी ऊस लागवडी मध्ये बटाटा अंतरपीकचे फायदेशीर उत्पादन

अलीकडील पोस्ट

आडसाली ऊस लागवडी मध्ये झेंडू चे अंतरपिक शेतकऱ्यासाठी फायदेशीर

                     ऊस शेती ही महाराष्ट्र मधील महत्वाचे नगदी पिक आहे. पण अलीकडच्या काळात ऊस शेती ला अनेक अडचणी ला समोर जावे लागत असून दिवसेंदिवस वाढत्या महागईमुळे लागवडी ते तोडणी पर्यंत चा खर्च शेतकऱ्यांना परवडणारे नाही. लागवड, खते, पाणी, तोडणी पर्यंत येणाऱ्या खर्च चे नियोजन करणे गरजेचे आहे. यासाठी आपण ऊस पिकात झेंडू ची  अंतर पिक म्हणून  लागवड कितीपत फायदेशीर ठरु शकते हे पाहू.शेतकरी मित्रानो आज आपण ऊस लागवडी मध्ये झेंडू चे अंतर पिके या विषयी अधिक महिती घेऊ. झेंडू लागवड चे महत्व आपला देश म्हणजे सण समारंभचा देश.वर्षभर अनेक सण आपण साजरे करत असतो. झेंडू फुलाचे आपल्या देशात अनेक सण समारंभ प्रसंगी मोठया प्रमाणात उपयोग होत असतो.यामुळे झेंडू साठी वर्षभर मागणी असेत. आपल्या कडे श्रावण महिना पासून ते दिवाळी पर्यंत झेंडू च्या फुलाला मागणी असते. गणपती उत्सव, नवरात्री, दसरा, दिवाळी हे सण उत्सव च्या काळात झेंडू लागवड करणे गरजेचे आहे. लागवडी चा कालावधी       शेतकरी मित्रांनो आपण आडसाली ऊस लागवडी मध्ये अंतर पिक म्हणून ...

आला पुन्हा मैत्रीला बहर.. बावीस वर्षानंतर उघडले शाळेतील आठवणीचे दरवाजे

                       लहानपण म्हणजे एक पुस्तकच असते आणि या पुस्तकाचे प्रत्येक पान म्हणजे आठवणी. जसे जसे आपण एकदा पान वाचायला घेतो आणि आपल्याला माहितच आहे. आठवणींचा एक एक प्रसंग डोळ्यासमोर येऊ लागतो . मित्र मैत्रिणी बरोबर घालवलेले मोहक क्षण तुमच्या मनात खोल कुठेतरी असतात. याचबरोबर शाळेत घालवलेले दिवस ,शाळेतील आठवणी, मित्र,मैत्रिणी,दंगा मस्ती हे आपल्या जीवनातील प्रत्येक टप्प्यावर साथ देत असतात. कधी काळच्या काहीच अर्थ नसलेल्या गोष्टी जीवनाच्या प्रत्येक क्षणला कामी येतात. या मधून पुढे प्रेरणा मिळत जाते.             बावीस वर्ष म्हणजे खुप मोठा काळ असतो, याच काळात घेउन जाणाऱ्या आठवणीने भरलेला दिवस नुकताच आमच्या सर्वांच्या आयुष्यात येऊन गेला . बावीस वर्षानंतर  दहावी चे विद्यार्थी स्नेह मेळावा आयोजित करण्यात आलेल्या. जीवनातील एक खुप मोठा काळ पार पडल्यावर, पुन्हा एकदा शालेय जीवनातील आठवण यावी. याला निम्मित झाले ते स्नेह मेळावा. का कुणास ठाऊक सर्वांना पुन्हा एकदा शाळा आवडायला लागली. पुन्हा वर्गात जाऊन ...

तुम्हाला हे माहितीच नसेल!! तुमची बायको तुमच्यावर नकळत खूप प्रेम करते असते

                 लग्न झाले की नवरा बायको चे एक नविन नाते तयार होते.आधी कधीच एकमेकाला न भेटलेले जीव या नात्यात गुंतू लागतात. दोघे पण एकमेकांना ओळखू लागतात.पण तरी पण नवऱ्या ला वाटत असते. लग्न तर केलें पण माझी बायको माझ्यावर प्रेम करत असेल ना ? याच प्रश्नाचे उत्तर आज शोधण्याचं प्रयत्न करू. बायको आणि नवरा यांच्या नात्यातील एक धागा सुखाचा आणि दुसरा दुःखाचा असतो. तरी पण बऱ्याच पुरुषांना माहितच नसते की तुमची बायको तुमच्या वर प्रेम करते असते. तर जाणूनन घेऊ *कठीण परस्थितीत खंबीर साथ देणारी             जीवन म्हणजे संघर्ष होय. जीवन जगताना अनेक गोष्टी साठी संघर्ष करावा लागतो. कधी सुख तरी कधी दुःख याचा लपंडाव सुरू असतो. पण बायको नेहमीच तुमच्या सोबत असते. कितीही कठीण परस्थिती ओढवली तरी खंबीरपणे उभी राहते. तिची अश्याची वेळीची महत्त्वपूर्ण भुमिका  तुमच्यावरील प्रेमाची कबुली देत असते.  * वेळप्रसंगी नवऱ्या साथी इतरांबरोबर लढण्याची भुमिका             तूम्ही कधी पण याचे निरक्षण करा...

अहो!! मला खरच काहीतरी करायचे आहे, मी पण पैसे कमवावे का?

              आजचा   विषय खासकरून आपण अश्या महिलांना साठी आहे. ज्यांना अनेक वेळा प्रश्न पडतो,की मला काहीतरी स्वतःच करायला पाहिजे.मी पण पैसे कमवायला पाहिजेत का? असा प्रश्न अनेक वेळा महिलांच्या डोक्यात खेळत असतो; पण काय करायचे तेच नक्की कळतं नाही. शिक्षण असते पण कोणत्या मार्गाने जावे हे काही केल्या समजत नाही. घर, मुलबाळ सांभाळताना वेळ निघून जात असतो आणि पडलेल्या प्रश्न चे उत्तर मात्र सापडत नाही. काहीतरी करण्याचा करता आपल्याला स्वतः ला बदललेल पाहिजे. आज आपण याच निगडित गोष्टीचा विचार करणार आहोत जे तुम्हाला निर्णय घेण्याकरता मार्गदर्शक ठरतील * स्वतः ला ओळखा, स्वतः ची ओळख करुन घ्या                           आपण कोण हे आपल्याला माहितच पाहिजे. आपली स्वतः ची ओळख करून घेता आली तरच. स्वभाव, आवड अश्या अनेक गोष्टींची माहिती असेन गरजेचे आहे. ज्याची आवड असेल ते कार्य आपण करायला घेतले तरच तुम्ही ते योग्य रित्या पार पाडू शकता. काहीतरी करायला  पाहिजे तर आवडीचे करा ना!! त्या साठी...