आजकाल इंटरनेट च्या युगात सोशल मिडियामुळे जग आपल्याला हातात आले आहे. सर्व काही एका क्लिक वर.. सोशल मीडिया लोकांच्या संपर्क करण्याचे साधन उत्तम साधन बनले आहे. आज दूर कूठे राहणार व्यक्ती आपल्या सहज रित्या संपर्क करू शकतो. पण तुम्हाला महिती आहे का हेच सोशल मीडिया अनेकाचे उत्पन्न चे साधन बनले आहे. अनेक लोक सोशल मीडिया चा वापर करुन पैसे कमवत आहेत. चला तर मग आज आपण सोशल मीडिया चा वापर करुन पैसे कसे कमवता येतील हे पाहू.
* यूट्यूब
यूट्यूब हे आजकाल सर्वांच्या परिचयाचे आहेच. आजकाल कोणत्या प्रकारचे महिती पाहिजे तर लगेच यूट्यूब अथवा गूगल वरून जाऊन पाहतो. पण तुम्हाला महिती आहे का हेच यूट्यूब तुमच्या उत्पन्ननाचे साधन बनू शकते. तुमच्याकडे कोणती ही कला असेल जसे की नृत्य, अभिनय, भाषण, पाककला याचे व्हिडिओ बनवून यूट्यूब वापर करुन सार्वनिक करून या माध्माद्वारे मिळणाऱ्या जाहिरातीतून उत्पन्न कमवू शकतो.
* फेसबुक
फेसबुक पण एक असे माध्यम आहे यातूनच आपण आपल्या मित्र मंडळी, घरातील व्यक्ती, कामातील परिचयाच माणसे यांच्या संपर्क साधावा येतो. पण हे आपल्याला माहितच आहे,याच बरोबर तूम्ही फेसबुक पेज च्या माध्यमातून पैसे कमवू शकतो. तुम्हाला चांगले विचार मांडला येतात, कोणत्या ही कलेच्या व्हिडिओ, रील, आणि ब्लॉग लिहून फेसबुक माध्यमातून जगासमोर मांडू शकतो. यातून जाहिराती द्वारे मिळणाऱ्या उत्पन्न तून पैसै कमवू शकतो.
* इंस्टाग्राम
इंस्टाग्राम हे पण एक लोकांच्या संपर्कात राहण्याचे चांगले माध्यम आहे. जिथे तुम्हाला लोक फॉलो करतात आणि तूम्ही नवनवीन रीलस व्हिडिओ, फोटो, मेसेज सार्वजनिक करुन लोकांच्या संपर्क साधू शकता. यातून तुमच्या पेज वर दिसणाऱ्या जाहिराती तून मिळणाऱ्या उत्पन्न तून पैसे मिळतात. त्याचबरोबर एखाद्या वस्तू चे प्रमोशन करून मानधननातून पैसै मिळतात. अनेक नामांकित अभिनेते, अभिनेत्री, नेते मंडळी यातून आपले अधिकचे उत्पन्न कमवतात.
* ब्लॉगर
तुमच्यात जर लिहण्याची कला आहे. तूम्ही उत्तम लिहू शकता, तर तूम्ही ब्लॉग लिहून पैसै ची कमाई करू शकता. चांगले विषयावर लिखाण करून ते ब्लॉगर चा वापर करून सार्वजनिक करू शकता. इथे सुध्दा ब्लॉग मध्ये दिसणाऱ्या जाहिरातीतून उत्पन्न मिळते. त्याच्या बरोबर एकादया वस्तू, पुस्तक याच्या बद्दल लिहून त्याचे प्रमोशन करून पैसे कमवता येऊ शकतात
वाचकहो.. आज या लेखातून आपण निवडलेल्या मोजक्या माध्यम ची महिती घेतली. सोशल मिडिया पूर्ण पणे जाहिरातीतून उत्पन्नावर अवलंबून असते. त्यामुळे आजकाल च्या डिजिटल मार्केटिंग मुळे हि माध्यमे चांगला प्रकारे उत्पन्न मिळवतात आणि त्यातूनच काही भाग आपल्याला देतात. तरच मग लागा कामाला आणि करा काही तरी सुरू.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा