लग्न झाले की नवरा बायको चे एक नविन नाते तयार होते.आधी कधीच एकमेकाला न भेटलेले जीव या नात्यात गुंतू लागतात. दोघे पण एकमेकांना ओळखू लागतात.पण तरी पण नवऱ्या ला वाटत असते. लग्न तर केलें पण माझी बायको माझ्यावर प्रेम करत असेल ना ? याच प्रश्नाचे उत्तर आज शोधण्याचं प्रयत्न करू. बायको आणि नवरा यांच्या नात्यातील एक धागा सुखाचा आणि दुसरा दुःखाचा असतो. तरी पण बऱ्याच पुरुषांना माहितच नसते की तुमची बायको तुमच्या वर प्रेम करते असते. तर जाणूनन घेऊ
*कठीण परस्थितीत खंबीर साथ देणारी
जीवन म्हणजे संघर्ष होय. जीवन जगताना अनेक गोष्टी साठी संघर्ष करावा लागतो. कधी सुख तरी कधी दुःख याचा लपंडाव सुरू असतो. पण बायको नेहमीच तुमच्या सोबत असते. कितीही कठीण परस्थिती ओढवली तरी खंबीरपणे उभी राहते. तिची अश्याची वेळीची महत्त्वपूर्ण भुमिका तुमच्यावरील प्रेमाची कबुली देत असते.
*वेळप्रसंगी नवऱ्या साथी इतरांबरोबर लढण्याची भुमिका
तूम्ही कधी पण याचे निरक्षण करा तुमची बायको तुमच्या बरोबर नेहमी भांडेल. पण तुम्हाला कोणी काही बोलले तर तिला मुळीच खपणार नाही. वेळप्रसंगी इतरांबरोबर लढण्याची तयारी ठेवते. तूम्ही म्हणाल हे माहितीच नव्हेत, पण शक्य आहे ते म्हणजे तुमच्यावरील प्रेमामुळे
*नवऱ्याच्या खुश पाहण्यासाठी सततची धडपड
माझा नवऱ्याला नेहमी खुश आहे हे पाहण्याची नेहमी धडपड सुरू असते. त्यासाठी त्याला आवडणाऱ्या गोष्टी करायचा प्रयत्न करत असेल. नवरा खुश असल्याचे समाधान तिच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत असतो. तीची ही धडपड तर तुमचा वरील प्रेमाची पोहच पावती देते. पण आपल्याला माहितच नसते
* वाईट कृती करण्यापासून रोखते
बायको चे नकळत तुमचा अनेक गोष्टी कडे बारीक लक्ष असते. तूम्ही म्हणाल हे प्रत्येक बायको नेहमीच आपल्या नवऱ्यावर लक्ष ठेवते. तिला असे मनापासून वाटतं असते की माझा नवरा काही तरी वेगळे करत नाही ना. वेळप्रसंगी आपला मनाविरुद्ध जाऊन ओरडते पण. हे माहितीच नसते हीच तर तिच्या मनातील तुमच्या वरील असलेल्या प्रेमाची आठवण करून देत असते.
वाचकहो.. या लेखातून मला एवढेच सांगायचे तात्पर्य आहे. नवरा आणि बायको नेहमीच आपल्या मनात एकमेकांबद्दल प्रेम असते. प्रत्येक वेळी ते व्यक्त होतेच असे नाही. प्रत्येक बायको नेहमीच आपल्या नवऱ्यावर प्रेम करते. फक्त व्यक्त करण्याची माध्यम वेगळी असतील.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा