मुख्य सामग्रीवर वगळा

आपल्या या चार चांगल्या सवयी आपले व्यक्तिमत्त्व घडवतात

    

     दररोज च्या चांगल्या वाईट सवयींचा आपल्या व्यक्तीत्त्वावर परिणाम होत असतोच . आपल्या सवयी हे आपलं व्यक्तिमत्त्व घडवत असतात यात कुणाला काही  शंका नाही. यासाठीच तर आपण सवयीवर लक्ष्य ठेऊन योग्य ते नियंत्रण ठेवता आले पाहिजे. ज्यामुळे आपले व्यक्तिमत्त्व हे समाजात खुलून दिसेल. चला तर मंग जाणून घेऊयात त्या कोणत्या चांगल्या सवयी आहेत ज्यांचा आपल्या जडण - घडणीत महत्वाचे स्थान असू शकते.


* चांगल्या साहित्याचे वाचनाची सवय   

    वाचन करून विचार चांगले होतात असे अनेक जण सांगून गेले आहेत. योग्य साहित्याचे, पुस्तकाचे वाचन करणे म्हणजे चांगले विचार ग्रहण करणे होय. यासाठी आपण वाचनाची सवयी लावून घेतली पाहिजे. थोर पुरषांचे चरित्र, साहित्य यांचे वाचन लाभदायक ठरते.



* चांगले कार्यक्रम पाहण्याची सवय   

    आजकाल इंटरनेट आणि सोशल मीडियाचा च्या युगात आपल्या समोर अनेक गोष्टी येतं असतात. पण यातूनच आपण ठरवले पहिजे की आपल्या साठी काय योग्य आहे. आपले व्यक्तिमत्व घडविण्यात मार्गदर्शक ठरेल असेच कार्यक्रम पाहिले पाहिजेच. यातून आपल्याला योग्य ती दिशा मिळू शकते.



* चांगले विचार ऐकण्याची सवय  

      आपल्या आजूबाजूला अनेक गोष्टींचा गोंधळ चाललेला  असतो. चांगले ,वाईट विचार कानी पडत असतात. यातूनच आपण योग्य त्या गोष्टी ऐकण्याची सवय लाऊन घेतली पाहिजे. चांगले विचार ऐकणे म्हणजे व्यक्तिमत्व विकास घडवून आणण्यासाठी प्रयत्नशील राहणे होय.



* चांगले बोलण्याची आणि वागण्याची सवय  

        समाजात वावरत असताना आपण इतरांबरोबर कसे बोलतो, वागतो याकडे सर्वांचे लक्ष असते. यावरुन आपला आपल्या आजूबाजूला असणाऱ्या अनेक लोकावर आपली छाप पडत असते. हा समाज याची योग्य ती दखल घेत असतो. आपणास नकळत हे घडत असते. आणि यातूनच आपले व्यक्तिमत्व खुलतं जाते.



         वाचकहो आज् आपण या चार सवयी बद्दल जाणून घेतले. तुमचे व्यक्तिमत्व घडविण्यात या योग्य भूमिका पार पाडू शकतात. त्यामुळे या सवयी चा आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग करुन घ्या आणि आपले व्यक्तिमत्व ला योग्य दिशा दया.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बटाटा लागवड - अश्या पदधतीने घ्या पूर्वहंगामी ऊस लागवडी मध्ये बटाटा अंतरपीकचे फायदेशीर उत्पादन

आला पुन्हा मैत्रीला बहर.. बावीस वर्षानंतर उघडले शाळेतील आठवणीचे दरवाजे

अहो!! मला खरच काहीतरी करायचे आहे, मी पण पैसे कमवावे का?