मुख्य सामग्रीवर वगळा

अहो!! मला खरच काहीतरी करायचे आहे, मी पण पैसे कमवावे का?

          

 आजचा विषय खासकरून आपण अश्या महिलांना साठी आहे. ज्यांना अनेक वेळा प्रश्न पडतो,की मला काहीतरी स्वतःच करायला पाहिजे.मी पण पैसे कमवायला पाहिजेत का? असा प्रश्न अनेक वेळा महिलांच्या डोक्यात खेळत असतो; पण काय करायचे तेच नक्की कळतं नाही. शिक्षण असते पण कोणत्या मार्गाने जावे हे काही केल्या समजत नाही. घर, मुलबाळ सांभाळताना वेळ निघून जात असतो आणि पडलेल्या प्रश्न चे उत्तर मात्र सापडत नाही. काहीतरी करण्याचा करता आपल्याला स्वतः ला बदललेल पाहिजे. आज आपण याच निगडित गोष्टीचा विचार करणार आहोत जे तुम्हाला निर्णय घेण्याकरता मार्गदर्शक ठरतील


* स्वतः ला ओळखा, स्वतः ची ओळख करुन घ्या

                
         आपण कोण हे आपल्याला माहितच पाहिजे. आपली स्वतः ची ओळख करून घेता आली तरच. स्वभाव, आवड अश्या अनेक गोष्टींची माहिती असेन गरजेचे आहे. ज्याची आवड असेल ते कार्य आपण करायला घेतले तरच तुम्ही ते योग्य रित्या पार पाडू शकता. काहीतरी करायला  पाहिजे तर आवडीचे करा ना!! त्या साठी स्वतः ची ओळख करुन घेतली पाहिजे.



* स्वतः वर आणि निवडलेल्या कामावर विश्वास ठेवा.


                 कोणते ही काम सुरू करण्याचा आधी आपण निवडलेल्या कामवर आणि स्वतः विश्वास असणे फार गरजेचे आहे. विश्वास असेल तरच तुम्ही ते काम यशस्वी रित्या पार पाडू शकतो. काहीतरी करायला पाहिजे त्या आधी स्वतः वर ठेऊन कामात झोकून दिले पाहिजे. विश्वास ठेवा आणि कामाला लागा.



* लोक काय म्हणतील याच्याकडे लक्ष देऊ नका.


               आपल्या अनेक कामे आपण लोक काय म्हणतील या विचाराने करतच नाही. एखादे कार्य करायला घेतो त्याधी लोकांचा विचार करतो. कारण नसताना ते कार्य पूर्ण होतं नाही. स्वतः मात्र काहीतरी करायला पाहिजे म्हणायचे आणि लोक काय म्हणतील या विचाराने सोडून द्यायचे. हा एक तुमच्या कार्यातील अडथळा आहे हा जर तुम्हीं पार केला तर, तुम्हाला काहीतरी करायला पाहिजे याचे उत्तर सापडेल.


* अनेक वाटा शोधा, काहीतरी नक्की आवडेल असे सापडेल.


           काम करायचे पैसे कमवायचे अनेक वाटा आहेत. अनेक ठिकाणी असलेल्या संधी चा विचार केला नंतर योग्य मार्ग नक्की सापडेल, आणि त्या मार्गाने वाटचाल सुरू केली पाहिजे. एकदा का तुम्ही तुमच्या आवडीचा विषय, स्वतः वर विश्वास, आपल्या ध्येयावर लक्ष ठेवला की तुम्ही आयुष्यात काहीतरी नक्की कराल.



          वाचकहो, या लेखातून मला एवढेच सांगायचे आहे आपण ठरवले तर आपण काहीही करू शकतो आणि पैसे पण कमवू शकतो.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बटाटा लागवड - अश्या पदधतीने घ्या पूर्वहंगामी ऊस लागवडी मध्ये बटाटा अंतरपीकचे फायदेशीर उत्पादन

आला पुन्हा मैत्रीला बहर.. बावीस वर्षानंतर उघडले शाळेतील आठवणीचे दरवाजे