लहानपण म्हणजे एक पुस्तकच असते आणि या पुस्तकाचे प्रत्येक पान म्हणजे आठवणी. जसे जसे आपण एकदा पान वाचायला घेतो आणि आपल्याला माहितच आहे. आठवणींचा एक एक प्रसंग डोळ्यासमोर येऊ लागतो . मित्र मैत्रिणी बरोबर घालवलेले मोहक क्षण तुमच्या मनात खोल कुठेतरी असतात. याचबरोबर शाळेत घालवलेले दिवस ,शाळेतील आठवणी, मित्र,मैत्रिणी,दंगा मस्ती हे आपल्या जीवनातील प्रत्येक टप्प्यावर साथ देत असतात. कधी काळच्या काहीच अर्थ नसलेल्या गोष्टी जीवनाच्या प्रत्येक क्षणला कामी येतात. या मधून पुढे प्रेरणा मिळत जाते.
बावीस वर्ष म्हणजे खुप मोठा काळ असतो, याच काळात घेउन जाणाऱ्या आठवणीने भरलेला दिवस नुकताच आमच्या सर्वांच्या आयुष्यात येऊन गेला . बावीस वर्षानंतर दहावी चे विद्यार्थी स्नेह मेळावा आयोजित करण्यात आलेल्या. जीवनातील एक खुप मोठा काळ पार पडल्यावर, पुन्हा एकदा शालेय जीवनातील आठवण यावी. याला निम्मित झाले ते स्नेह मेळावा. का कुणास ठाऊक सर्वांना पुन्हा एकदा शाळा आवडायला लागली. पुन्हा वर्गात जाऊन बसावे वाटले. आठवणी ने मानत गोंधळ उडवून टाकला.
शालेय जीवनातील टप्पा पार करून , नोकरी, लग्न, घर, संसारकडे लक्ष देताना आयुष्यातील सर्वांत मोठा काळ कधी पार पडला ते कळले नाही. प्रत्येक जण आपल्या नोकरीत, व्यवसायात, शेतीत, घरात यशस्वी आणि समाधानी जीवन जगत आहे. व्यक्ती कीतीही मोठा झाला तरीही तो आपल्या शाळेला कधीच विसरू शकत नाही. जगाच्या पाठीवर कुठेही गेला तरी शाळेतली संस्कार आणि जीवनमूल्ये तशीच आपल्याबरोबर असतात.
स्नेह मेळावा कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यावेळीचे आमचे गुरुवर्य पण भेटलं. त्यांचे विचार ऐकायला भेटले. शालेय जीवनात नकोसे वाटणारे शिक्षक आता अचानक सर्वांना आपलेसे वाटू लागले. कारण आता प्रत्येकाला माहीत आहे त्यांनी केलेल्या संस्कारामुळे तर यातील प्रत्येक जण आप आपल्या आवडत्या क्षेत्रात यश मिळवत आहेत. त्यांनी केलेल्या शिक्षेची आठवण यावी आणि पुन्हा एकदा विद्यार्थी बनून बसावे. कारण अजुन खुप काही शिकणे बाकी आहे. जे या पुढील आयुष्यतील वाटचाली साठी प्रेरक ठरेल.
माझ्यासाठी तर दिवस काही वेगळाच ठरला. मी पण अनेक मित्रांना खुप वर्षांनी भेटणार होतो. मनात नुसते विचार येत होते. मला कोणी ओळख देईल का? माझ्या बरोबर कोणी बोलले का? पण इथे तिथे मात्र उलटेच झाले, मला बरेच जण ओळखत होते मात्र मी त्यांना लगेच नाही ओळखू शकलो. पण अनेक मित्रांची नव्याने ओळख झाली असे म्हंटले तर वावगे ठरणार नाही. खुप वर्षा नंतर झालेले भेटी गाठीने मनात वेगळाच आनंद देऊन जात होती. प्रत्येक क्षण हवा हवासा वाटत होता.ती दिवस पुन्हा एकदा नविन चेतना, ऊर्जा, देऊन गेला. काहीवेळासाठी वाटले आपण स्वप्नात तर नाही ना.....
वाचकहो... या लेखाचा उद्देश असा आहे. आज काल सोशल मिडिया मुळे कितीही जवळ वाटत असलो तरीही आपण अजुन एकमेका पासून लांबच आहोत. या साठी सतत भेटले पाहिजे असले स्नेह मेळावे आयोजित केले पाहिजेत. शाळा, कॉलेज जीवनाचे पुन्हा एकदा त्या काळात जाऊन अनुभवले पाहिजे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा