शेतकरी मित्रांनो आज आपण महिती घेणार आहोत. पूर्वहंगामी ऊस लागवडी करताना अंतर पिके म्हणुन बटाट्याची लागवड लागवड कितीपात फायदेशीर ठरु शकते. ऊस शेती करताना आपण आपल्या खर्च चे योग्य ते नियोजन करता आले पाहिजे. या साठी ऊस पिकात आंतरपीक पद्धती आपल्या खर्च काढून देऊ शकते. पारंपरिक पद्धतीने आपल्या कडे गहू, कांदा, सोयाबीन, हरभरा अश्या अंतर पिकांची आपण जमिनीच्या प्रकारानुसार निवड करतो. ऊस शेती करताना वाढणारा खर्च पाहता. आपल्याला कमी कालावधी मधील नगदी पीक निवडले पाहिजे. ज्यामुळे ऊसाला लागणारा खर्च यातून काढता येऊ शकतो. बटाटा हे पिक नगदी पीक असल्याने याची अंतर पिकं म्हणून घेतल्याने फायदेशीर ठरु शकते.
बटाटा लागवड चे महत्व
आपल्या सर्वांना आवडणारा बटाटा हे आपल्या दररोच्या आहारातील मुख्य घटक आहे. भाजी मध्ये, चिप्स मध्ये याचा मोठ्या प्रमाणात उपयोग होतो. भारतीय अनेक पाककृती मधील हा एक घटक आहे.त्यामुळे हे एक नगदी पिके म्हणुन बटाट्याची निवड आपण करू शकतो. ऊस पिकात आंतरपिके घेताना ऊस ला स्पर्धा करणारे पिकं नसावे जेणेकरून ऊसाच्या वाढीवर परिणाम होतो. बटाटा पीक जमिनखाली ये असल्यानं त्याचा कोणता ही परिणाम ऊस पिकावर होत नाही.
बटाटा लागवड कालावधी
पूर्वहंगामी ऊस पिकात आंतरपिके म्हणुन बटाट्याची लागवड करताना त्याचा कालावधी हा ऑक्टोंबर ते नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस ऊस लागवडी बरोबर करावी. अथवा लागवडी नंतर पंधरा दिवसांनी करावी. त्या साठी जमिनी मध्ये पुरेशा ओलवा असावा.
बटाटा लागवड पद्धत
ऊस पिकात आंतरपिके घेतल्याने सरी मध्ये ऊस आणि वरंब्यावर बटाटा लागवड पद्धत करावी. यासाठी चांगले बेण्याची निवड करून त्यावर कीटकनाशक,बुरशी नाशक लावून प्रक्रिया करून लागवडी साठी घ्यावे. एका बटाट्याची दोन काप करून अथवा पूर्ण बटाटा वरंब्यावर दिड फूट अंतर ठेवून लागवड करावी. त्यासाठी पुखराज किंवा सिंदुरी जातीच्या वाणाची निवड करून .नंतर हलके पाणी सोडावे.
नंतर पहिल्या आठवड्यात आळवणी करून घ्यावी. ऊसाला पण याचं वेळी आळवणी करावी. त्या नंतर प्रत्येक पंधरा दिवसांनी फवारणी नियोजन करणे गरजेचे असल्याचे त्या पद्धतीने नियोजन करणे गरजेचे आहे . बटाटा पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव होतो त्यामुळे वेळोवेळी कीटकनाशक, बुरशी नाशक आणि उपयुक्त खताची फवारणी केली जाते. या साठी आपल्या जवळच्या कृषी तज्ञाचा सल्ला घ्यावा.
बटाटा काढणी कधी करावी
बटाटा हे पिक लागवडी पासून दोन ते तीन महिन्यात काढणी साठी येतो. बटाटा झाडावर पांढरे फुल येत अश्यावेळी बटाटा वरील सर्व पाला वाळल्या नंतर कुदळी च्या साह्याने वरंब्यातील बटाटा काढून घ्यावा. आणि सर्व लहान मोठे बटाटे वेचून सावली मध्ये ठेवावेत. त्यानंतर त्याची प्रतवारी करून बाजारामध्ये विक्री साठी घेउन जावे.
बटाटा काढणी कधी करावी
बटाटा हे पिक लागवडी पासून दोन ते तीन महिन्यात काढणी साठी येतो. बटाटा झाडावर पांढरे फुल येत अश्यावेळी बटाटा वरील सर्व पाला वाळल्या नंतर कुदळी च्या साह्याने वरंब्यातील बटाटा काढून घ्यावा. आणि सर्व लहान मोठे बटाटे वेचून सावली मध्ये ठेवावेत. त्यानंतर त्याची प्रतवारी करून बाजारामध्ये विक्री साठी घेउन जावे.
बटाटा पिकाचे उत्पादन, बाजारपेठ आणि आर्थिक गणित
साधारण पणे उत्पादनाचा विचार करता एकरी पाच ते दहा पर्यंत उत्पादन मिळू शकते. वर्षभर मागणी असल्याने दर पण चांगला मिळतो . जवळच्या बाजारपेठेत दराचा अंदाज घेऊन माल विक्री साठी घेउन जावे. उत्तम मालाला योग्य भाव असतो त्यामुळे चांगल्या मालाची प्रतवारी करावी. अश्या पदधतीने बटाटा पिकाचे नियोजन करता येईल अंतर पिके म्हणुन बटाट्याची लागवड करावी.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा