मुख्य सामग्रीवर वगळा

आडसाली ऊस लागवडी मध्ये झेंडू चे अंतरपिक शेतकऱ्यासाठी फायदेशीर

      

      

       ऊस शेती ही महाराष्ट्र मधील महत्वाचे नगदी पिक आहे. पण अलीकडच्या काळात ऊस शेती ला अनेक अडचणी ला समोर जावे लागत असून दिवसेंदिवस वाढत्या महागईमुळे लागवडी ते तोडणी पर्यंत चा खर्च शेतकऱ्यांना परवडणारे नाही. लागवड, खते, पाणी, तोडणी पर्यंत येणाऱ्या खर्च चे नियोजन करणे गरजेचे आहे. यासाठी आपण ऊस पिकात झेंडू ची  अंतर पिक म्हणून  लागवड कितीपत फायदेशीर ठरु शकते हे पाहू.शेतकरी मित्रानो आज आपण ऊस लागवडी मध्ये झेंडू चे अंतर पिके या विषयी अधिक महिती घेऊ.


झेंडू लागवड चे महत्व

आपला देश म्हणजे सण समारंभचा देश.वर्षभर अनेक सण आपण साजरे करत असतो. झेंडू फुलाचे आपल्या देशात अनेक सण समारंभ प्रसंगी मोठया प्रमाणात उपयोग होत असतो.यामुळे झेंडू साठी वर्षभर मागणी असेत. आपल्या कडे श्रावण महिना पासून ते दिवाळी पर्यंत झेंडू च्या फुलाला मागणी असते. गणपती उत्सव, नवरात्री, दसरा, दिवाळी हे सण उत्सव च्या काळात झेंडू लागवड करणे गरजेचे आहे.





लागवडी चा कालावधी

      शेतकरी मित्रांनो आपण आडसाली ऊस लागवडी मध्ये अंतर पिक म्हणून झेंडू लागवड करताना ऊस लागवडी बरोबरच झेंडू ची रोप लागवड करावी. उसाची आडसाली लागवड साधारण पणे जुलै ते ऑगस्ट मधे केली जाते. त्यामुळे झेंडू ची रोप लागवड पण याचं वेळी करावी. जेणे करून पुढील काळात येणाऱ्या सण उत्सव मध्ये झेंडू तोडणी साठी येईल.


लागवड ची पद्धत

 ऊस पिकात आंतरपीक पिक म्हणून करताना ऊस सरी मध्ये आणि झेंडू वरंब्यावर लावावा यासाठी जवळच्या नर्सरी मधून निरोगी रोपे तयार करून घ्यावीत अथवा तयार असेल ती आणावीत. रोप लागणं करताना साधारण पने दोन रोपांतील अंतर एक ते दीड फूट असावे. आणि दोन सरी मधील अंतर चार ते साडेचार फूट असावे. लागवडीपूर्वी जमिनीत पुरेशी वोलावा असावा त्यासाठी झेंडू लागवड ऊस लागवड केल्या नंतर पंधरा दिवसांनी करावी.

आळवणी / फवारणी/ शेंडा खुडणे

ऊस बरोबरच झेंडू ला पण आळवणी करावी. रोप लागवडनंतर पहिल्या आठवड्यात आळवणी करून घ्यावी. त्यामुळे पांढऱ्या मुळांची वाढ चांगली होते. त्यानतंर पुढील प्रत्येक पंधरा दिवसांनी उपयुक्त खते, कीटकनाशक बुरशी नाशक याची नियमित फवारणी करावी. या साठी आपल्या जवळच्या कृषी अधिकारी यांच्या सल्ला घ्यावा. रोप लागणं  महिन्यानंतर आणि फुले तोडणी च्या आधी रोपाचा पहिला शेंडा खुडणे गरजेचे असते. त्यामुळे चांगले फुटवे येतात आणि फुले पण भरपूर लागतात. यासाठी पहिले येणारे फुले तोडून सरी मध्ये टाऊन द्यावे.

फुले तोडणी आणि विक्री व्यवस्थापन

रोप ची पहिली कळी तोडल्या नंतर पंधरा दिवसांनी आपण झेंडू चा पाहिला तोडा करू शकतो. पण फुलांची तोडणी करण्याआधी बाजारामध्ये फुलाची मागणी आणि त्याचे दर याचा अंदाज घेऊन तोडणी करावी. सण समारंभ प्रसंगी मोठया प्रमाणात मागणी असल्याने त्याची महिती घेऊन तोडणी करावी. विक्री व्यवस्थापन करताना आपल्या जवळच्या बाजार पेठे फुले विक्री करावी त्यामुळे वाहतूक खर्चात बचत होते.त्या बरोबर फुले खराब होऊन होणारे नुकसान टाळता येऊ शकते.

दर आणि नफ्याचे गणित

झेंडू फुलाला मागणी असते. परंतु बाजार मधील आवक आणि मागणी यावर दर अवलंबून असतो. साधारणता दहा रुपये ती शंभर रूपये पर्यंत दर भेटू शकतो. गणपती, नवरात्र,दसरा , दिवाळी या सणामध्ये झेंडू ला चांगला दर भेटतो तेव्हाच तर आडसाली ऊस लागवडी बरोबर झेंडू लागवड केली तरी ऊस लागवडी चा खर्च यातून निघून जातो.ऊस पिकात आंतरपीक म्हणून घेतल्याने वेगळा असा इतर कोणता खर्च करावं लागतं नाही आणि मुख्य पिकाला कोणती हि हानी पोहचत नाही. ऊस पिकाला याचा फायदा च होईल. याचा बरोबरच झेंडू पॉवर टिलर च्या साह्याने ऊस मोठ्या भरी बरोबरच गाडून उत्तम रित्या खत तयार होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बटाटा लागवड - अश्या पदधतीने घ्या पूर्वहंगामी ऊस लागवडी मध्ये बटाटा अंतरपीकचे फायदेशीर उत्पादन

आला पुन्हा मैत्रीला बहर.. बावीस वर्षानंतर उघडले शाळेतील आठवणीचे दरवाजे

अहो!! मला खरच काहीतरी करायचे आहे, मी पण पैसे कमवावे का?